Skip to main content

Dnyandeo Limbaji Tambare Varishth Mahavidyalay

Dnyaneshwari Shikshan Prasarak Mandal's

Dnyandeo Limbaji Tambare Varishth Mahavidyalay

Tagadgaon, Taluka - Shirur (Kasar), District - Beed – 414205

Affiliated to Kavikulaguru Kalidas Sanskrit University, Ramtek & Recognized by the Government of Maharashtra.

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

ज्ञानदेव लिंबाजी तांबारे वरिष्ठ महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर (का.) जिल्हा बीड येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या स्थापनेच्या उद्देशांचे स्मरण करत उच्च शिक्षण, संस्कृत भाषा, भारतीय ज्ञानपरंपरा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेच्या संवर्धनासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची स्थापना १८ सप्टेंबर १९९७ रोजी रामटेक येथे करण्यात आली असून, भारतीय संस्कृत भाषा, साहित्य आणि संशोधनाच्या संवर्धनासाठी हे विद्यापीठ कार्यरत आहे..